या चिमण्यांनो परत फिरा रे | Ya Chimanyano Parat Phira

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासून दूर
चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या

अवतीभवती असल्यावाचुन कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा आमुच्या कधीही कामाचा
या बाळांनो या रे लौकर वाटा अंधारल्या


गीतकुंदा बोकिल, लता मंगेशकर
चित्रपटजिव्हाळा
गीत प्रकारचित्रगीत

No comments: