विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्या तुम्ही केला चट्टामट्टा !
भातुकलीचा सार्या तुम्ही केला चट्टामट्टा !
पसाभर शेंगदाणे, पसाभर गूळ
एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ?
खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा !
कुठुन मेलं बाहुलीचं लग्न काढलं आम्ही?
विहीण म्हणून नशिबी आलात हो तुम्ही !
बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढा मोठा !
सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो
भिकार्याशी नातं जोडुन बसलो !
वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा !
गीत | – | सुषमा श्रेष्ठ |
गीत प्रकार | – | बालगीत |
No comments:
Post a Comment