विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी
प्रभू आले मंदिरी
प्रभू आले मंदिरी
गुलाल उधळुनी नगर रंगले
भक्तगणांचे थवे नाचले
रामभक्तिचा गंध दरवळे
गुढ्यातोरणे घरोघरी
आला राजा अयोध्येचा
सडा शिंपला प्राजक्ताचा
सनई गाते मंजुळ गाणी
आरती ओवाळती नारी
श्रीरामाचा गजर होउनी
पावन त्रिभुवन झुकते चरणी
भक्त रंगले गुणी गायनी
भक्तियुगाची ललकारी
गीत | – | माणिक वर्मा |
राग | – | भूप, नट |
गीत प्रकार | – | राम निरंजन, भावगीत |
No comments:
Post a Comment