विझले रत्‍नदीप नगरात | Vijhale Ratnadeep Nagarat

विझले रत्‍नदीप नगरात
आता जागे व्हा यदुनाथ

अंधारातुन प्रकाश निवळे
हलके हलके पूर्वा उजळे
दंवबिंदूंचे मोती झाले पर्णांच्या तबकात

जागी झाली सुर्वणनगरी
अरुणासह ये उषासुंदरी
सोन्याची नवप्रभा पसरली सोन्याच्या दारात


गीत–मालती पांडे ( बर्वे )
चित्रपट–मायाबाजार (ऊर्फ वत्‍सलाहरण)
गीत प्रकार–चित्रगीत

No comments: