विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | Vishnumay Jag

(सांवळें सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयीं माझे ।

आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड
तुझें नाम गोड पांडुरंगे ॥)

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥

अइका जी तुह्मी भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥२॥

कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥३॥

तुका ह्मणे एका देहाचे अवयव ।
सुखदुःख जीव भोग पावे ॥४॥


गीतपं. जितेंद्र अभिषेकी
बालगंधर्व
गीत प्रकारसंतवाणी
  टीप
• स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी, संगीत- शांक-नील
• स्वर- बालगंधर्व, संगीत- ???.

No comments: