विश्रब्ध मनाच्या कातरवेळीं | Vishrabdha Manachya

विश्रब्ध मनाच्या कातरवेळीं
एखाद्या प्राणाची दिवेलागण

सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण

एखाद्या प्राणाच्या दर्पणीं खोल
विलग पंखांचें मिटत मन

एखाद्या प्राणाचें विजनपण
एखाद्या फुलाचें फेडीत ऋण

गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
प्राजक्तचुंबन एखादा प्राण

तुडुंब जन्मांचें सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून

एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचें कोवळें ऊन

निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण


गीतउत्तरा केळकर
गीत प्रकारभावगीत, मना तुझे मनोगत
  टीप
• काव्य रचना- २८ ऑक्टोबर १९६०.

No comments: