विश्वनाट्य सूत्रधार | Vishwa Natya Sutradhar

विश्वनाट्य सूत्रधार तूच श्यामसुंदरा ।
चातुरी तुझी अगाध कमलनयन श्रीधरा ॥

सुई-दोरा नसुनी करी, रात्रीच्या घन तिमिरी ।
कशिदा तू काढतोस गगनपटी साजिरा ॥

मधुबिंदू मधुकरांस, मेघबिंदू चातकास ।
ज्यास-त्यास इष्ट तेच पुरविसी रमावरा ॥

कुंचला न तव करांत, तरीही तूच रंगनाथ ।
अमिट रंग अर्पितोस जगत रंगमंदिरा ॥


गीतजयवंत कुलकर्णी, पं. राम मराठे, रामदास कामत
नाटकशाब्बास बिरबल शाब्बास
रागशंकरा
गीत प्रकारनमन नटवरा
  टीप
• नांदी.

No comments: