लाखात लाभले भाग्य तुला ग बाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालीस रखुमाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालीस रखुमाई
मेघासम जो हसरा श्यामल
चंद्राहुनी तो अधिकही शीतल
नाम जयाचे मुखात येता
रूप दिसे ग ठायी ठायी
भक्तांचा जो असे आसरा
या विश्वाचा हरी मोहरा
क्षणांत इकडे क्षणांत तिकडे
हाकेला ग धाव घेई
गीत | – | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | – | भक्तीगीत, विठ्ठल विठ्ठल |
No comments:
Post a Comment