यश तेची विष झाले | Yash Techi Vish Jhale

यश तेची विष झाले, देहात ते उफाळे
स्फुंदून काय आता जावे मिटून डोळे?

सुमहार वाटला जो, तो एक साप काळा
प्रासाद थाटला जो, ती बंद बंदिशाळा
त्या बंधनात बांधी माझे मलाच जाळे

हा खेळ संपलासे आता न हारजीत
या हुंदक्यात गेले कोंडून प्रेमगीत
माझ्याच काजळाने हे तोंड होय काळे


गीतलता मंगेशकर
चित्रपटआकाशगंगा
गीत प्रकारचित्रगीत, नयनांच्या कोंदणी

No comments: