यतिमन मम मानित त्या | Yatiman Mam Manit Tya

यतिमन मम मानित त्या
एकल्या नृपाला ।
आदिअंत ज्यास नसे
त्या सनातनाला ॥

गगनधरा ज्या निवास
बंधन भय नाहि त्यास
समिर करिल काय नमन
सधन सागराला ॥


गीत–रामदास कामत
नाटक–ययाति आणि देवयानी
राग–तिलककामोद
गीत प्रकार–नमन नटवरा, मना तुझे मनोगत

No comments: