येऊ कशी घनश्याम | Yeu Kashi Ghanshyam

येऊ कशी घनश्याम?
काय करू मी काही सुचेना आता घरचे काम !

जादुभरी ती तुझी रे मुरली, लावी वेड जिवाला
तूच आता रे सांग श्रीधरा समाजाऊ कशी रे मनाला
आतुरले मन तुज भेटाया नाही जीवा आराम !

तुजवीण भासे सुने सुने हे गोकुळ सारे मजला
अंत नको रे पाहू आता दर्शन दे राधेला
दिनराती मी जपते आहे मुखी तुझे रे नाम !


गीत–
संगीत–माणिक वर्मा
गीत प्रकार–हे श्यामसुंदर, भावगीत

No comments: