योगी पावन मनाचा ।
साही अपराध जनांचा ॥१॥
साही अपराध जनांचा ॥१॥
विश्व रागे झाले वन्ही ।
संते सुखे व्हावे पाणी ॥२॥
शब्दशस्त्रे झाले क्लेश ।
संती मानावा उपदेश ॥३॥
विश्व पट ब्रह्म दोरा ।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥
गीत | – | प्रसाद सावकार |
नाटक | – | गीता गाती ज्ञानेश्वर |
गीत प्रकार | – | नमन नटवरा, संतवाणी, मना तुझे मनोगत |
No comments:
Post a Comment