याजसाठीं केला होता अट्टहास | Yajsathi Kela Hota Attahas

याजसाठीं केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥

आतां निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥

कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचें तेणें गुणें ॥३॥

तुका ह्मणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥४॥


गीतपं. भीमसेन जोशी
गीत प्रकारसंतवाणी

No comments: