यमपाश गळ्याशीं ज्यास | Yampash Galyashi Jyas

यमपाश, गळ्याशीं ज्यास लागला,
त्यास मला कां देतां? ।
कां मांस विकुनि, धर्मास वाकडे जातां? ।
पाळिलें घातलें खाया, अजवरी ।
बकरीस मोल बहु याया, ज्यापरी ।
ही तुमचि मुलीवर माया, कां खरी? ।
जगतांत, सदय सकळांत माउली तात,
मुलीला असतां ।
मग तुम्हीच इतके कठोर कां गे होतां? ॥


गीत–गो. ब. देवल
संगीत–गो. ब. देवल
स्वर–
नाटक–संगीत शारदा
चाल–मम गौरीही कूपि न मी
गीत प्रकार–नमन नटवरा

No comments: