यश अंती लाभणार | Yash Anti Labhanar

यश अंती लाभणार, सत्य हे
यावर अमुचा दृढ विश्वास, अमुचा दृढ विश्वास
यश अंती लाभणार, सत्य हे

येईल भूवरी शांती, सत्य हे
यावर अमुचा दृढ विश्वास, अमुचा दृढ विश्वास
येईल भूवरी शांती, सत्य हे

चालू प्रगतीचीच वाट; घालून हातात हात
चालू प्रगतीचीच वाट, सत्य हे
यावर अमुचा दृढ विश्वास, अमुचा दृढ विश्वास
चालू प्रगतीचीच वाट, सत्य हे

भीती नसे आता; ना भय मुळी आता
भीती नसे आता, सत्य हे
यावर अमुचा दृढ विश्वास, अमुचा दृढ विश्वास
भीती नसे आता, सत्य हे

गीतआकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकारस्फूर्ती गीत

No comments: