यश हे अमृत झाले, सुख स्वर्गीचे आले
दिग्विजयाच्या मनोरथावर नक्षत्रांचे झुलते अंबर
मागेपुढती राजपथावर लक्ष दीप लागले
स्तुतिसुमनांचे उधळित झेले, जनगौरव तो जयजय बोले
कीर्तध्वजावर लावून डोळे भाग्य पुढे चालले
वैभव मिरवीत मंदिरी येता, दिसेल डोळी ती मंगलता
सुख अंधारी मन व्याकुळता दु:ख सुखे हासले
यश हे अमृत झाले
सुख स्वर्गीचे आले
परि दु:ख सुखे हासले
गीत | – | तलत महमूद |
चित्रपट | – | पुत्र व्हावा ऐसा |
गीत प्रकार | – | चित्रगीत |
No comments:
Post a Comment